
A Dussehra get-together with Aundh–Bopodi's senior citizens at the renovated Ram-Lakshman Udyan. (Original post in Marathi below.)
विजयादशमीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून आज औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसोबत स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आनंदाचे क्षण अनुभवले. राम-लक्ष्मण उद्यानातील विश्रांती कट्ट्यावर झालेल्या या भेटीत ज्येष्ठांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि दसऱ्याच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
यावेळी राम-लक्ष्मण उद्यानाच्या नूतनीकरणासह विश्रांती कट्टा आणि परिसरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि मिळालेले आशीर्वाद हे समाजकार्यात अधिक उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देणारे ठरले.
या स्नेहमेळाव्यास पुण्यनगरीचे उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, नगरसेवक सनी दादा निम्हन, नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठांचे प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हीच समाजकार्यासाठी खरी ताकद आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत औंध-बोपोडीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू!
आपली,
सौ. सपना आनंद छाजेड
नगरसेविका, पुणे महानगरपालिका · उपाध्यक्षा, शहर सुधारणा समिती
