
Followed up pending civic issues of the ward with the MLA at his Janata Darbar. (Original post in Marathi below.)
आज आमदार मा. सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या जनता दरबारात उपस्थित राहून प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न तसेच नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
यावेळी प्रभागातील नागरिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली. मा. सिद्धार्थदादा शिरोळे यांनी मांडलेल्या सर्व समस्यांची सकारात्मक दखल घेतली आणि त्या सोडविण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवून त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.
नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत, जनसेवा आणि प्रभागाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील!
आपली,
सौ. सपना आनंद छाजेड
नगरसेविका, पुणे महानगरपालिका · उपाध्यक्षा, शहर सुधारणा समिती
