New momentum for Pune: Metro inauguration and groundbreaking

Inauguration of the Maan–Hinjawadi–Shivajinagar Metro line and groundbreaking of four new Phase 2 corridors. (Original post in Marathi below.)
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. माण–हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण आणि पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नव्या मार्गिकांचे भूमिपूजन अशा विकासाच्या ऐतिहासिक सोहळ्याला आज उपस्थित राहण्याचा योग आला.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ यांचीही उपस्थिती होती.
माण–हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगर या महत्त्वाच्या भागांना आधुनिक सार्वजनिक वाहतुकीची जोड मिळणार आहे. विशेषतः नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
याचबरोबर खडकवासला–खराडी, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली आणि माणिकबाग–नळस्टॉप या नव्या मेट्रो मार्गिकांमुळे पुण्याच्या विविध भागांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मा. सौ. मंजुषाताई नागपूरे, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
विकासाच्या या प्रवासात पुणेकरांच्या अपेक्षा आणि शहराच्या भविष्यातील गरजा केंद्रस्थानी ठेवून आधुनिक, सक्षम आणि सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण होणे हीच काळाची गरज आहे.
विकसित पुण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल!
आपली,
सौ. सपना आनंद छाजेड
नगरसेविका, पुणे महानगरपालिका · उपाध्यक्षा, शहर सुधारणा समिती
