
Inaugurated Kalagram's Diwali exhibition as chief guest by lighting the lamp. (Original post in Marathi below.)
आज कलाग्रामतर्फे आयोजित दिवाळी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला. यावेळी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
या प्रदर्शनात विविध कलात्मक वस्तू, आकर्षक दिवाळी साहित्य आणि महिलांनी आपल्या कौशल्यातून साकारलेल्या कलाकृतींचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळणे आणि त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे कला, संस्कृती आणि उद्योजकतेला नवी दिशा मिळते.
या सुंदर आयोजनासाठी नूपुर पवार, गौरी ढोले-पाटील आणि संपूर्ण कलाग्राम टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार.
महिलांच्या कल्पकतेला नवी ओळख आणि त्यांच्या कर्तृत्वाला नवी भरारी मिळो, हीच मनापासून सदिच्छा!
आपली,
सौ. सपना आनंद छाजेड
नगरसेविका, पुणे महानगरपालिका · उपाध्यक्षा, शहर सुधारणा समिती
