मुख्य मजकुराकडे जा
← All updates
Women empowerment· Balgandharva Rangmandir, Pune

Women's self-help group exhibition at Balgandharva

Women's self-help group exhibition at Balgandharva

Visited PMC Social Development Department's exhibition and sale by women's self-help groups. (Original post in Marathi below.)

आज बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमाला भेट दिली.

या प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स मांडण्यात आले होते. महिलांच्या मेहनतीतून, कौशल्यातून आणि कल्पकतेतून साकारलेल्या उत्पादनांना पाहून आनंद झाला. अशा प्रदर्शनांमुळे महिलांना आपल्या उत्पादनांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळते, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळते आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाण्याची संधी उपलब्ध होते.

महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे, त्यांच्या कष्टांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणारे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यास हातभार लावणारे असे उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत.

या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व महिला बचत गटांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

महिला सक्षमीकरणातूनच सक्षम समाजनिर्मिती!

आपली,

सौ. सपना आनंद छाजेड

नगरसेविका, पुणे महानगरपालिका · उपाध्यक्षा, शहर सुधारणा समिती

#महिलासक्षमीकरण#महिलाबचतगट#आर्थिकस्वावलंबन#महानगरपालिका#Pune
Share on WhatsApp
ComplaintTrackWhatsApp