मुख्य मजकुराकडे जा
← All updates
National unity

‘Mi Bharatpremi’ march for unity and democracy

‘Mi Bharatpremi’ march for unity and democracy

Joined the ‘Mi Bharatpremi’ march for the nation's unity, integrity and constitutional values. (Original post in Marathi below.)

आज आयोजित करण्यात आलेल्या ‘मी भारतप्रेमी’ पायी मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

देशाची एकता, अखंडता, लोकशाही व्यवस्था आणि संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मोर्चात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देत लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्याचा हा उपक्रम होता.

लोकशाही अधिक सक्षम होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा सन्मान करणे आणि देशाच्या एकतेसाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमधून राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होते.

भारताची एकता आणि अखंडता जपण्याचा, संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया!

एक भारत, एकात्म भारत आणि समर्थ भारत!

आपली,

सौ. सपना आनंद छाजेड

नगरसेविका, पुणे महानगरपालिका · उपाध्यक्षा, शहर सुधारणा समिती

#मीभारतप्रेमी#लोकशाही#संविधान#भारताचीएकता#AundhBopodi
Share on WhatsApp
ComplaintTrackWhatsApp